Thursday, September 18, 2008

आजकाल हे मन माझं वेड्यासारखं वागतं,
विचारामध्ये त्याच्या हे रात्र रात्र जागतं ।
स्वत:शीच बोलता... स्वत:शीच हसतं
आठवणीमध्ये त्याच्या हे दिवसभ्रर रमतं ॥

बेधुंद होऊन त्याच्या संगे स्वप्नात हे नाचतं
नभीचे ते चंद्र तारे कवेत घेऊ पाहतं ।
कधी व्याकूळ होऊन त्याला साद घालतं
अन न थकता तास न तास वाट त्याची पाहतं॥

सांगा कोणी याला आता सारं काही संपले
फीर आता मागे वेड्या... ते विश्व नाही आपले ।
नकार देऊन त्याच्यापुरते प्रश्न त्याने मिटवले
अन एक ना उलगडणारे कोडे मात्र मला त्याने घातले ॥

तुटली आहे माळ अन विखुरले रे मोती
घरंगळली रेती... झाली मूठ माझी रिती ।।

सांगा ना हो याला...
म्हणावं विसरून जा ती नाती
मृगजळमागे धावताना येते निराशाच हाती...
येते निराशाच हाती....

No comments: