Monday, November 10, 2014

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन………………..म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

Thursday, June 3, 2010

जाणता राजा..!!

गीतकार :कुसुमाग्रज
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर






म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात

आपले मन जाणणारी एकच असते......

आपले मन जाणणारी एकच असते......
आपले मन जाणणारी एकच असते......

पण आपल्यासाठी गर्दीतुन साखर आणणारी मुंगी एकच असते.


जिवनात जशा वाटा बर्‍याच असतात,
पण त्यातली आपली वाट एकच असते,
तशाच जगात सुंदर्‍या बर्‍याच असतात,
पण मुक्याने आपले मन जाणणारी एकच असते......

दुःखात आपल्याला समजावणारे हजार असतात,
पण आपले दुःख घेऊन सुख देणारी एकच असते,
जखमांवर फ़ुंकर मारणारे आपले अनेक असतात,
पण जख्मांवर मलम लावणारी एकच असते..........

झोप येत नाही म्हणून गोष्ट सांगणारे फारच असतात,
पण मांडीवर डोके घेऊन अंगाई गाणारी एकच असते..........
मित्रांच्या वारुळातही आपले असे म्हणणारे सगळेच असतात,
पण आपल्यासाठी गर्दीतुन साखर आणणारी मुंगी एकच असते......

मैत्री

मैत्री म्हणजे काय असतं?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;

मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;

मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ...

......तिला मी शोधतो आहे......

......तिला मी शोधतो आहे......

"परि" नसली तरी "खरी" असावी ती...
सुसंकृत, भारतीय परंपरा जपणारी.
आपल्या संस्कृतीचा अभिमान असणारी.
"मी मराठी भाषिक"असं अभिमानानं सांगणारी.
समजूतदार अणि माझी प्रिय मैत्रिण होणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एवढं सगळे गुणं "असणारी"सापडणे कठीणयं हो!
पण शोधात आहे.

Thursday, May 20, 2010

क ची कमाल

आपण लहानपणी पासून ही गोष्ट ऐकत आलो आहोत .

तीच गोष्ट पुन्हा एकदा नव्या रूपात ...
केशवाचे कपट, काकांची कमाल

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये
'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.

काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.

काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.

कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.

कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.

केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.

कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने
केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर
केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार -

क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,

कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे!!

Miss Call

खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील ||